ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यपदाची निवडणूक जिंकल्यास एच-1 बी व्हिसा प्रणालीत सुधारणा करून ग्रीनकार्ड कोटा पद्धती रद्द करेन, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी दिले आहे.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांच्याकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे.
अमेरिकेत परदेशी नागरिकांना नोकरी करण्यासाठी एच-1 बी व्हिसा आवश्यक असतो. हा व्हिसा अस्थलांतरित पद्धतीचा आहे. त्यामुळे अमेरिकेत सत्ता आल्यास एच-1 बी व्हिसा प्रणालीत सुधारणा करून ग्रीनकार्ड कोटा पद्धती रद्द करण्यात येईल. अमेरिकेच्या 8 राज्यात 13 लाख भारतीय मतदार आहेत. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बायडेन यांनी हे आश्वासन दिले आहे.