प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर विधानपरिषद निवडणूकीला दिवसेंदिवस राजकिय रंग चढत असून आज दि. 24 नोव्हेंबर रोजी विधान परिषद संदर्भात धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी अर्ज भरताना खोटी माहिती भरली आहे. असा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आरोप केले आहे. त्यामुळे सतेज पाटील विधान परिषदेत जरी निवडून आले तरी तीन महिन्यांच्या आत त्यांची आमदारकी रद्द करणार असल्याचे ही महाडिक यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील 5 गुंठे जमीनीची माहिती अर्जामध्ये दिलेली नाही. ती लपवली आहे. ताराराणी चौक येथील जमिनीची खोटी माहिती अर्जात नमूद केली आहे. तसेच 53 हजार 98 स्क्वेयर फूट जमीन असताना केवळ 23 हजार फूट जमिनीची माहिती अर्जात नमूद केली आहे. ही माहिती देणे आयोगाला बंधनकारक असताना पाटील यांनी ती दिलेली नाही. तसेच सयाजी हॉटेल संदर्भात महानगरपालिकेला चुकीची माहिती देत कोट्यवधींचा घरफाळा थकीत आहे. कर भरला असेल तर निवडणूक आयोगाने अर्ज वैद्य ठरवतो. मात्र पाटील यांनी तो भरलेला नाही. असे महाडिक यांनी सांगितले.
याबरोबर कॉसमॉस बँकेकडून 85 कोटी रुपये कर्ज घेतले, त्याचा विनियोग कशासाठी केला यांची माहिती अर्जात नाही. पाटील यांना महसूल विभागाच्या नोटीस दिली असताना, अर्जात महसुलावर निरंक असा उल्लेख आहे. त्यामुळे माजी खासदार धनंजय महाडिक यासंदर्भात उद्या दि. २५ नोव्हेंबर रोजी हायकोर्टात तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वरील सर्व कारणांचा विचार करता सतेज पाटील विधान परिषदेत निवडून आल्यास तीन महिन्यांच्या आत त्यांची आमदारकी न्यायालयात जात रद्द करणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.