ऑनलाइन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात जोरादार आंदोलन सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी आज, नागरिकांना उद्देशुन एक मोठं वक्तव्यं केलं आहे.
त्या म्हणाल्या, जर कोणी तुमचे अधिकार हिसकवण्यासाठी आलं तर त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल. दक्षिण 24 परगनामधील एका रॅली दरम्यान त्या बोलत होत्या.
जर तुमच्याकडे कोणी आलं व तुमची माहिती विचारली, तर त्यांना ती देऊ नका. सीएए, एनपीआर, एनआरसी या ठिकाणी अंमलबजावणी होणार नाही. जर कुणी तुमच्याकडे आले आणि माहिती मागितली तर देऊ नका. मी तुमची पहारेकरी आहे. तर कुणी तुमचे अधिकार हिसकावण्यासाठी येत असतील तर, त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.