तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आढावा बैठक
ऑनलाईन टीम / कोल्हापूर
कोरोना तिसऱ्या लाटे संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील संभाव्य कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली, यावेळी झालेल्या चर्चेत कोरोना रुग्णांची संख्या दीड पटीने वाढण्याची शक्यता टास्क फार्स कडून व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात दुसऱ्या लाटे दरम्यान दिवसाला 16 हजार 99 रुग्ण सापडले होते हे रेकॉर्ड आहे, तर तिसऱ्या लाटेत हा आकडा प्रतिदिन 24 हजार पर्यंत जाईल अशी शक्यता पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 4 हजार ऑक्सिजन बेड तर नॉन ऑक्सिजन बेड 11 हजार बेड उपलब्ध असुन होम आयसोलेशन बाबत कडक निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी घरात नियमांचे पालन होत नसल्याचे बैठकीत मत व्यक्त करण्यात आले. याबरोबरच गर्दीची सार्वजनिक ठिकाण शोधली असून त्याठिकाणी कडक नियमावली लागु करण्यात येणार असल्याचं ही यावेळी पालकमंत्री म्हणाले. तसेच जिल्ह्यात 17 ऑस्क्सिजन प्लँट सुरू आहेत. आता 185 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्याची तयारी पुर्ण झाल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना आतापर्यंत 3 हजार लोकांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असुन उर्वरितांना टप्या टप्याने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. तसेच 18 वर्षा वरील 30 लाख नागरीकांपैकी पहिल्या 27 लाख लोकांचे लसीकरण पुर्ण तर दुसरा डोस घेतलेल्यांची 19 लाख संख्या झाली असल्याचे ही माहीती त्यांनी यावेली दिली.