ऑनलाईन टीम / तरुण भारत
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका साऱ्या जगाला बसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या असून भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यातच सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कच्या तेलाचे भडकल्याने भारतात ही महागाईचा भडका होईल, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर निर्बंध घालत रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला आहे. यातच भारतबाबत अमेरिकेने एक मोठे वक्तव्य केले आहे.
भारत सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी करून अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार नाही तर असे पाऊल जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला इतिहासाच्या चुकीच्या बाजूला ठेवणार, असे मंगळवारी युनायटेड स्टेट्सने स्पष्ट सांगितले. कारण भारताने रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी केल्यास अमेरिकेने घातलेली बंदी काहीशी निष्फळ ठरु शकते.
त्यामुळे कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याच्या रशियन ऑफरवर भारताच्या भूमिकेविषयी विचारले असता व्हाईट हाऊसची प्रेस सचिव जेन साकी यांनी यावेळी बोलताना म्हणाल्या की इतर देशांनी अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन करावे.