प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थाच्या गाडीवर झालेल्या वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.दत्ताजी विलास टिपुगडे ( वय 56 )रा .सरनाईक कॉलनी शिवाजी पेठ ,कोल्हापूर असे यांचे यांचे नाव आहे . शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .
पोलिसांनी सांगितले की 11 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय32 )व अजय विलास पाटील ( वय 36 ) दोघे राहणार माजगावकर मळा .हे दोघे अंबाई टँक परिसरातील खाद्यपदार्थाच्या गाडीवर नाष्टा करण्यासाठी गेले होते त्यावेळी तेथील कामगारांशी त्यांचा किरकोळ कारणातून वाद झाला होता . त्यावेळी या दोघांवर दोघांनी तलवार हल्ला केला होता .त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते .याप्रकरणी स्वप्नील पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे आणि त्यांचा मुलगा सागर टिपुगडे या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी पोलिसांनी सागर टिपुगडे याला अटक केली होती . मात्र माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे फरारी झाले होते .पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली . त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .