बेळगाव : आत्महत्या करण्यासाठी कणबर्गी येथील तलावात उडी घेतलेल्या एका वृद्धेला वाचविण्यात चार मुलांना यश आले आहे. बुधवारी सकाळी कणबर्गी येथे ही घटना घडली असून या वृद्धेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रुक्मिणी पाटील (वय 75, रा. खनगाव) या वृद्ध महिलेने बुधवारी सकाळी कणबर्गी तलावात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. याचवेळी तलाव परिसरात असलेल्या काही मुलांनी पाण्यात उडी टाकून तिला पाण्याबाहेर काढले व ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील यांना कळविण्यात आली. विठ्ठल पाटील यांनी खनगाव येथील वृद्धेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले व वृद्धेला त्यांच्या स्वाधीन केले. घरातील किरकोळ भांडणानंतर रुक्मिणी यांनी तलावात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Previous Articleभाजप हे अपयशी सरकार
Next Article बंदीजनांच्या लसीकरणात `आधार’चा अडथळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.