प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील मत्स्य उत्पादनाठी 23 तलावांचा ठेका देण्यासाठी निवीदा प्रसिध्द करण्यात आली होत़ी 23 पैकी 21 तलावांच्या निवीदेला प्रतिसाद लाभत मत्स्य विभागाला सातेसात लाखांचे परवाना शुल्क मिळाले आह़े तर 23 पैकी फक्त 2 तलावांच्या निवीदाला प्रतिसाद लाभला नसल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले आह़े
जिह्यातील 41 तलाव मत्स्य विभागार्तंगत येतात़ हे तलाव ठेकेदारी पध्दतीने मत्स्य उत्पादनासाठी देण्यात येतात़ याआधी 41 पैकी 18 तलावांचा ठेका देण्यात आला होत़ा मात्र या 18 तलावांचा ठेक्यांची मुदत डिसेंबर अखेर संपुष्टात येत आह़े मात्र कोवीडमुळे या कालावधी संपलेल्या तलावांची निवीदा प्रक्रिया रखडली होत़ी मात्र ही निवीदा देखील काहीच दिवसात सुरु होणार आह़े त्यामुळे या एकूण 41 तलावांच्या माध्यमातून सुमारे 12 लाखांचे परवानाशुल्क मत्स्य विभागाला मिळणार आह़े निवीदा प्रक्रिया ही मत्स्य व्यवसाय आयुक्तस्तरावरुन जाहीर होत असत़े यंदा चिपळूण तालुक्यामधील फणसवाडी व दापोली तालुक्यातील शिरसाड येथील तलावांच्या निवीदेला प्रतिसाद लाभला नसल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आल़े या दोन तलावांची निवीदा प्रक्रिया 18 तलावांच्या निवीदे बरोबर होणार आह़े
जिह्यातील तलावाव्दारे मत्स्य उत्पादनासाठी मच्छीमार उत्सुक नसल्याचे दिसून येत़े कारण जिह्यामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पावसामुळे हे तलाव तुटुंब भरतात़ त्यामुळे तलावामधील मासळी पाण्याबरोबर वाहून जातात़ त्यामुळे मत्स्य उत्पादन करण्याऱयाचे आर्थिक नुकसान होत़े यामुळे येथिल मच्छीमार याकडे गांभीर्याने पाहत नाह़ी