सातारा/प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील एका हॉटेल समोर गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकून सुमारे 3.5 लाखांचा गुटखा व व 3 लाख रुपयांचे वाहन असा मिळून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई रात्री उशिरा झाली असून यामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. अन्न, भेसळ व औषध प्रशासनाला सदर कारवाईची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.