पेडणे / प्रतिनिधी
तळर्ण पेडणे येथील श्रीदेव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या निमित्त सकाळी विविध धार्मिक विधी, रात्री 12 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक तद्नंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाटय़ मंडळातर्फे दशावतारी नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.