प्रतिनिधी / पुणे
तळेगाव दाभाडे – तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला आज (शनिवारी) सकाळी अचानक आग लागली.आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती.थोड्याच वेळात आग आटोक्यात आली.आग नेमक्या कशामुळे लागली आणि आगीत नेमके किती नुकसान झाले याबाबत माहिती मिळू शकली नाही.