ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यावर बायडेन प्रशासन सकारात्मक असून, त्यांनी त्यादृष्टीने तयारी केली आहे.
बायडेन प्रशासनाचे असिस्टंट ॲटॉर्नी जनरल जॉन लुलजियान यांनी न्यायालयापुढे भारताची बाजू मांडली. ते म्हणाले, भारताकडे राणावर खटला चालविण्यासाठी सर्व पुरावे आणि प्रत्यार्पणासंदर्भात कागदपत्रे आहेत. त्यामुळे भारताच्या मागणीचा न्यायालयाने विचार करावा, असा युक्तिवाद त्यांनी केला. फेडरल कोर्टाचे न्यायाधीश जॅकलीन चुलजियान 22 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत.
मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली राणाला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला शिकागोत 14 वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. त्याची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने राणाला शिक्षा पूर्ण होण्याआधीच सोडण्यात आले होते. भारताच्या मागणीनंतर 2020 मध्ये अमेरिकेच्या प्रशासनाने त्याला पुन्हा लॉस अँजेलिस शहरातून अटक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणाबाबत बायडेन सरकार सकारात्मक आहे.