26/11 च्या मुंबई हल्ल्यांचा मुख्य आरोपी
लॉस एंजिलिस : अमेरिकेच्या लॉस एंजिलिस न्यायालयात 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. भारताच्या विनंतीवर प्रत्यार्पणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी भारतीय अधिकाऱयांचे पथक अमेरिकेत पोहोचले आहे. तहव्वूर हुसैन राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याने त्याला मागील वर्षी अटक करण्यात आली होती. भारताने यापूर्वीच त्याला फरार घोषित केले होते. अमेरिकेच्या प्रशासनाकडून सीलबंद दस्तऐवज न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत. राणाला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कोरोनाबाधित असल्याने आणि प्रकृती बिघडल्याने शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच मुक्तता करण्यात आली होती.