वार्ताहर/ कोगनोळी
आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्या आदेशानुसार निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी अचानक भेट दिली. अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती पोषण आहाराचे नियमित व निर्धारित प्रमाणात वितरण होते की नाही?, याच्या तपासणीसाठी तहसीलदार डॉ. भस्मे यांनी अंगणवाडीला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व अंगणवाडी सेविकांना सूचनाही केल्या.
राज्यात अंगणवाडी पोषण आहारात गैरव्यवहाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. परिणामी बालक, गर्भवती आहारासह लाभापासून वंचित राहिल्या. खात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन स्थानिक दंडाधिकाऱयांना अधून-मधून अंगणवाडीत जाऊन पोषण आहाराच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. चिकोडीचे प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांनी तालुक्मयात भेटी देण्याचे आदेश तहसीलदार डॉ. भस्मे यांना दिले होते. त्यानुसार डॉ. भस्मे यांनी आप्पाचीवाडी येथील अंगणवाडीला अचानक भेट देऊन माहिती घेतली.
आहाराचा साठा, स्वयंपाक खोली, बालकांना आहार वेळेत दिला जातो की नाही याचीही तपासणी केली. पोषण आहाराच्या कामकाजात गैरव्यवहार आढळला तर संबंधितावर रितसर कारवाई होणार आहे. यावेळी तलाठी घस्ती, ग्रामपंचायत सदस्य आनंदा कुवाळे, अंगणवाडी सेविका व शाळेचे शिक्षकवृद्ध उपस्थित होते.