सरकारी कर्मचाऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोप्पळ जिह्यातील बंगारुपेठ तालुक्मयाच्या तहसीलदाराचा खून करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करा. याचबरोबर सरकारी कर्मचाऱयांना संरक्षण द्या, या मागणीसाठी कर्नाटक राज्य नोकर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
बंगारुपेठ येथील तहसीलदार बी. के. चंद्रमाळेश्वर यांच्यावर चाकुने हल्ला करुन त्यांचा खून करण्यात आला. 9 जुलै रोजी ही घटना घडली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आरोपी वेंकटपती आणि राममूर्ती यांच्याजमिनीमध्ये जाऊन सर्व्हे करत असताना अचानकपणे हा हल्ला वेंकटपती याने केला. पोलीसांच्या समोरच ही घटना घडली.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱयांना त्या आदेशाप्रमाणे काम करावे लागते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी कर्मचारी, आरोग्याधिकारी यांच्यावर हल्ले वाढले आहेत. महसुल, भूमापन, ग्राम पंचायत पिडीओ यांच्यावर हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबणे गरजेचे आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास सरकारी कर्मचाऱयांना काम करणे अवघड जाणार आहे. तेंव्हा आता आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही यानिवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पाटील, जयकुमार देवळी, केंप्पान्ना निरवाणी, मैलार होरकेरी, किरण गणाचारी, गजानन कुलकर्णी, किरण सावंत, ए. एम. गवंडी, स्टॅन्डली गडदावर यांच्यासह संह्घटनेचे कार्यकर्ते आणि सरकारी कर्मचारी उपस्थित होते.