21 व्या शतकात जगातील बहुतांश कामे आता तंत्रज्ञानाच्या मदतीने होत आहेत. पोलीस सर्वप्रथम एखाद्या गुन्हय़ाची उकल संशयाच्या आधारावर करत होते. पण आता त्यांच्याकडे पुरावे पडताळून पाहण्यासाठी अनेक प्रकारची तंत्रज्ञाने उपलब्ध आहेत. पण या काळातही पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी तांत्रिकाची मदत घेत आहेत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेतील पोलिसांकडून हे घडत आहे. अमेरिकेत राहणाऱया एका व्यक्तीने हा दावा केला आहे. स्वतःच्या तंत्र विद्येच्या मदतीने अनेक हत्या आणि गुन्हय़ांची उकल केल्याचे त्याने म्हटले आहे.
गुन्हय़ाची उकल करण्यासाठी स्वतःची तंत्र शक्ती आणि पेंडुलमची मदत घेतो असे तो म्हणतो. या व्यक्तीचे नाव डॅन बाल्डविन आहे. लोकांना मदत करण्यास सुरुवात केल्यावर मला माझ्या शक्तींची जाणीव झाली. मला माझ्या या शक्तींबद्दल पूर्वी माहित नव्हते असे त्याने म्हटले आहे.
त्याने एका शोमध्ये स्वतःच्या कथित शक्तीबद्दल सांगितले आहे. तू जा आणि अपहरण करण्यात आलेल्या मुलांचा शोध घे असा आवाज मला एक दिवस ऐकू आला. त्यानंतर मी तांत्रिक मित्राच्या मदतीने तंत्र विद्या शिकलो आणि अपहरणाची प्रकरणे सोडवू लागलो. पेंडुलमद्वारे अपहरण करण्यात आलेल्या मुलांचा ठावठिकाणा कळतो. अनेक वर्षांपासून बंद असलेली प्रकरणेही सोडविली आहेत. गुन्हेगार कोण आहे हे पेंडुलमच्या माध्यमातून सांगतो. माझा पेंडुलम नेहमीच खरे उत्तर देत असल्याचा दावा त्याने केला आहे.