ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तांत्रिक बिघाडामुळे भारतीय वायुसेनेच्या ‘चिता’ हेलिकॉप्टरचे उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये पेरिफेरल एक्सप्रेस-वे वर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.
वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, ‘चिता’ हेलिकॉप्टरने आज सकाळी हिंडन एअरबेसहून उड्डाण केले होते. उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये हेलिकॉप्टर हवेत असतानाच पायलटला तांत्रिक बिघाडाची चाहुल लागल्याने त्याने वेळीच सावधानता बाळगत हेलिकॉप्टरचे एक्सप्रेस-वे वर इमर्जन्सी लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील पायलट आणि को-पायलट दोघेेेही सुरक्षित असून, हे हेलिकॉप्टर आता हिंडन एअरबेसवर परतले आहे.