प्रतिनिधी/ चिकोडी
आजच्या काळात सर्वांना नोकरी मिळणे दुर्लभ आहे. स्थानिक उपलब्धतेच्या आधारावर तांत्रिक विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वंयउद्योग सुरू करून उद्योजक बनावे. यातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जगात मेकॅट्रॉनिक्स विभागात मोठी मागणी असून रोबोटिक्समध्ये स्वयंप्रेरित उपकरणांचा वापर परदेशात करण्यात येत आहे. त्यामुळे मेकॅट्रॉनिक्सला मोठय़ा संधी आहेत. जर्मनीत सध्याच्या घडामोडीनुसार अनुभवाला प्राधान्य असल्याचे मत माजी विद्यार्थी व सध्या जर्मनी येथील नामवंत एयरबसन सप्लाय चैनचे अधिकारी जयानंद मठद यांनी व्यक्त केले.
येथील केएलई संस्थेच्या सी. बी. कोरे तांत्रिक महाविद्यालयाच्यावतीने आयोजित मेकॅट्रॉनिक्स विभागात अधिक संधी या विषयावर संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख आर. एस. खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विभागाचे प्रमुख पी. वाय. तुळजन्नवर व विद्यार्थी उपस्थित होते.