सेबीकडून लवकरच उपाययोजना : विविध समस्या सोडविणार
वृत्तसंस्था / मुंबई
गुंतवणूकदारांना टेक्निकल समस्या उदभवल्यास गुंतवणुकीत झालेले नुकसान मिळत नसायचे परंतु आता ही भरपाई मिळणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी शेअर बाजार रेग्युलेटर सेबी एक विशेष आराखडा तयार करण्यावर विचार करत आहे. गुंतवणूकदारांना उदभवणाऱया समस्या दूर करण्यासाठी सेबी यापुढे प्रयत्न करणार आहे. यामुळे येत्या काळात गुंतवणूकदारांना दिलासा प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय) च्या ऑटो पेमेन्ट सिस्टममध्ये अडचण निर्माण झाल्यास जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड खरेदी करतात, तेव्हा त्यांना काही प्रमाणात उशिरा युनिट प्राप्त होत असल्याचे दिसून येते. परिणामी अनेकांना ऑनलाईन पेमेन्ट करण्यात मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे काही अभ्यासकांनी म्हटले आहे.
आराखडा लवकरच तयार
सेबीच्या वार्षिक अहवाल 2019-20 नुसार सेबी तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष योजना तयार करत असल्याची माहिती आहे. रेग्युलेटर सेबी स्ट्रेस टेस्टच्या आधारे या समस्येवर उपाय शोधण्याचे काम करते आहे.
एनपीसीआय संदर्भात तक्रारी
एनपीसीआयच्या व्यवहारादरम्यान गुंतवणूकदारांना व्यवहार करताना अनेकदा टेक्निकल समस्या येतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.