सातारा / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील ताकवली येथे एका महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली. मीरा हणमंत वायकर (वय 41, रा. ताकवली, पो. नित्रळ, ता. जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ताकवली गावच्या हद्दीत शांताराम गोविंद लोटेकर यांच्या शेतामध्ये असणाऱ्या राईच्या ओढय़ाजवळ आयनाच्या झाडाखाली मीरा यांचा मृतदेह कुजल्यामुळे तो सडून खाली पडला होता. रविवार दि. 18 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. त्यानंतर याबाबतची तक्रार प्रदीप हणमंत वायकर (वय 48, रा. ताकवली) यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक आवळे करत आहेत.