प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील ताकारी तालुका वाळवा येथील प्रसिद्ध कमळ भैरवचा डोंगर पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. सांगली कराड मार्गावर एसटी व रेल्वेने येथे जाता येते. ताकारी रेल्वे स्टेशन पासून काही मिनिटांच्या अंतरावर हा डोंगर आहे.
ताकारी येथे कमळ भैरव ची नव्याच्या पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. सागरेश्वर अभयारण्य मध्ये सांबर चितळ काळवीट हरिण ससे आदी छोटे – मोठे प्राणी पहावयास मिळतात. अनलॉकमध्ये आता सागरेश्वर अभयारण्य सुरू झाले आहे. येथे जवळच सागरेश्वर आणि लिंगेश्वर ही प्रसिद्ध मंदिरही आहेत.
या डोंगरावर कमळ भैरव मंदिर असून मंदिराच्या पाठीमागील बाजूस दक्षिण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सागरेश्वर अभयारण्य आहे. येथील किर्लोस्कर पॉईंटवरून ताकारी परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते. शासनाने मंदिरे सुरू केल्याने आता कमळ भैरवसह ठिकठिकाणी भाविकांची पावले वळू लागली आहेत.