वारणानगर / प्रतिनिधी
गेल्या ३८ वर्षांपासून अभियांत्रिकी शिक्षणामध्ये दर्जेदार आणि भरीव शिक्षण देणाऱ्या येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त अभिमत (ऑटोनॉमस) संस्थेचा दर्जा मिळाला असून ही मान्यता यूजीसी आणि शिवाजी विद्यापीठाकडून महाविद्यालयाला मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आ. विनय कोरे यानी आज दिली.
स्वायत्त महाविद्यालय झाल्यानंतरसुद्धा पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश हे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार होतील असेही आ. कोरे यानी सांगीतले यावेळी श्री वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम प्राचार्य डॉ. सुनील आडेकर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय हे १९८३ मध्ये सुरू झालेल्या सर्वोत्कृष्ट आणि पहिल्या महाविद्यालयांपैकी एक आहे महाविद्यालयाचे आजवर १३००० हून अधिक विद्यार्थी भारतात आणि विदेशात विविध पदावर कार्यरत आहेत तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे महाविद्यालयाचे २० पेक्षा अधिक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेले आहेत महाविद्यालयाने क्रीडा स्तरावर राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेला आहे.
स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यामुळे महाविद्यालयाला इंडस्ट्री ओरिएंटेड अभ्यासक्रम तयार करता येतील तसेच नवीन कोर्सेस सुरू करता येतील त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेले आहे अभ्यासक्रम सुरू करताना हे अभ्यासक्रम जागतिक पातळीवर स्पर्धा करणारे असतील असा विश्वास आ. कोरे यानी व्यक्त करून अभ्यासक्रमा बरोबरच ऑटो नंबर स्टेटस मुळे महाविद्यालय स्वतः परीक्षा घेईल व त्याचा निकालही जाहीर करेल आणि स्वायत्त महाविद्यालयाच्या स्टेटस मुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध करता येतील असे सांगीतले. असे अध्यक्ष आ. कोरे यानी सांगितले.