कुपवाड / प्रतिनिधी
तानंग येथे राहणाऱ्या अवधूत विष्णू माळी (रा.कानडे मळा) यांच्या घरात घरफोडी झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून, याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधूत विष्णू माळी शुक्रवारी रात्री दरवाजा उघडा ठेवून कुटुंबांसह झोपले होते. चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात प्रवेश केला.यावेळी कपाटातील सोन्याचे गंठन व पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र असा ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.