प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे व कोषाध्यक्ष संजीव देसाई हे दिल्लीत पोहोचले असून त्यांनी तेथे गोवा प्रभारी सी.टी. रवी यांची भेट घेतली आणि चर्चा केली.
तानावडे व देसाई हे काही बैठकांसाठी दिल्लीत पोहोचले असून त्यांनी कोलारचे खासदार मुनीस्वामी व कर्नाटकचे मंत्री मुनीरन्न यांची तेथे भेट घेतली. रवी यांनी तानावडेंचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. गोव्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांच्यात चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.