अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 2 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याची माहिती अभिनेत्रीने ट्विट करत दिली आहे. विनिल मॅथ्यू दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाचे चित्रिकरण ऑक्टोबर महिन्यात संपले होते. हसीन दिलरुबा चित्रपट मर्डर मिस्ट्री आहे.
चित्रपटात तापसी पन्नूसाब्sात विक्रांत मैसी आणि हर्षवर्धन राणेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. अभिनेत्री तापसी यंदा अनेक चित्रपटांमधून झळकणार आहे. हसीन दिलरुबासह स्पोर्ट्स ड्रामापट ‘शाबाश मिट्ठू’मध्येही तापसी दिसून येणार आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची व्यक्तिरेखा साकारत आहे.
याचबरोबर ‘रश्मि रॉकेट’मध्येही ती दिसून येईल. या चित्रपटात अभिनेत्री गुजरातमधील एका धावपटूची भूमिका साकारत आहे. तसेच ‘लूप लपेटा’ चित्रपटातही तापसीने अभिनय केला आहे. हा चित्रपट जर्मन चित्रपट ‘रन रोला रन’चा अधिकृत रिमेक आहे.