प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. काही खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने अद्यापही बंद ठेवले आहेत. मोठय़ा हॉस्पिटलचे बिल हे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने सरकारने ताप, सर्दी, खोकला यांच्यावरील (पॅरासिटीमॉल) औषधांची विक्री खुली करावी, अशी मागणी इंडियन युनियन मुस्लीम लिगच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
यावेळी राज्य अध्यक्ष दस्तगीर आगा, एहजाज लोदी, इब्राहिम समशेर, आरिफ कटगेरी, वासीम शेख, मोईद्दीन आगा यासह इतर उपस्थित होते.