प्रतिनिधी /पणजी
तामने लोलये थेथील श्री देव कुडतर पुरुष शांतादुर्गा चामुंडेश्वरी कुडतरीकरण महामाया देवस्थानचा वार्षीक जत्रोत्सव शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाने होणार असून या जत्रेत प्रसिध्द आणि वैशिष्ठपूर्ण अशी निवंडुगाची दिवजे लागतात.
दरवर्षी कार्तीक शु. द्वादशीला म्हणजेच तुळशी विवाहच्या दिवशी हा जत्रोत्सव होत असतो यंदा ही जत्रा 5 नोव्हेंबर रोजी होणार असून रात्री 10.30 नंतर दिवजे लागतील अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. हा वैशिष्ठपूर्ण सोहळा पहाण्यासाठी भाविकानी मोठय़ संखेने यावे असे आवाहनही देवस्थान समितीने केले आहे.