ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरुच आहे. या युध्दाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या दरम्यान तामिळनाडूमधील 21 वर्षीय एरोस्पेस इंजिनीअरिंग विद्यार्थ्याला त्याच्या उंचीमुळे दोनदा भारतीय सैन्याने नाकारलं, तो आता जॉर्जियन नॅशनल लीजन या अर्धसैनिक दलाचा एक भाग म्हणून युक्रेनसाठी रशियाविरुद्ध लढत आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या सैनिकांसोबतच सामान्य युक्रेनियन नागरिकही रशियाविरुद्ध लढताना दिसत आहेत. आता युक्रेनच्या सैन्याला भारतीयांसह इतर अनेक देशांतील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. किव्ह इंडिपेंडंटने युक्रेनच्या लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की रशियाच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि भारतातील लोक लढत आहेत. तामिळनाडूमधील एका युवक आता युक्रेन निमलष्करी दलात सामील झाला असून तो रशियाविरुद्ध लढणार आहे.
तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील २१ वर्षीय विद्यार्थी, सैनिकेश रविचंद्रन हा रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनियन निमलष्करी दलात सामील झाला आहे. वृत्तानुसार, अधिकार्यांनी त्याच्या घरी जाऊन रविचंद्रनच्या पालकांशी संवाद साधला आणि असे कळले की त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता पण तो नाकारण्यात आला होता.