ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तामिळनाडूच्या रामेश्वरममधील धनुषकोडी आणि कच्चाथीवु बेटादरम्यान मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 600 मच्छीमारांवर श्रीलंकन नौदलाने हल्ला केला. या हल्ल्यात 50 मच्छीमार जखमी झाले असून, एक जण गंभीर आहे.
श्रीलंकन नौदलाने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकत मच्छीमारांवर हल्ला चढवला. आपला बचाव करण्यासाठी अनेक नौका माघारी परतण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र या नौकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. मासे पकडण्यासाठी टाकण्यात आलेली जाळीही कापण्यात आली.
हल्ल्यावेळी एक नौकाही बुडाली मात्र त्या नौकेवरील पाच मच्छीमारांना इतर मच्छीमांरांनी वाचवल्याने अनर्थ टळला.