ऑनलाईन टीम / चेन्नई :
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यासाठी ते दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांच्या मक्कल निधी मैनम पक्षासोबत युती करणार असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
तामिळनाडूत येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी एमआयएम कमल हासन यांच्या एमएनएम पक्षासोबत युती करून 25 जागा लढण्याच्या तयारीत आहे. एमएनएमसोबत युती करण्यासाठी एमआयएमची बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येते.
बिहार विधानसभा निवडणुकित पाच मुस्लिमबहुल मतदारसंघांत मोठा विजय मिळवल्यानंतर तामिळनाडूसाठी ओवैसी यांनी कंबर कसली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडूत मुस्लिम लोकसंख्या 5.86 टक्के आहे. तिथे यश मिळवण्यासाठी ते चेन्नई आणि त्रिची येथे सभा घेणार आहेत.