ऑनलाईन टीम / चेन्नई :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच तामिळनाडूमध्ये शनिवारी एका दिवसात 3965 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 226 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 69 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1,898 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर सध्या एकूण 1 लाख 34 हजार 226 रुग्णांपैकी 46 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज 3,591रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 85 हजार 915 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.