बेळगाव : आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद आर. राव यांचा कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीपाद राव हे सध्या भारतीय हवाई दलात कार्यरत असून सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये सेवा बजावित आहेत. मंत्री जारकीहोळी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी ते कौतुक करताना म्हणाले, तायक्वांदो या ऑलिम्पिक खेळाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकपदाचा दर्जा प्राप्त करून श्रीपाद यांनी जिल्हय़ातील पहिला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक म्हणून बहुमान मिळविल्याचे त्यांनी सांगितले. मागील वषी त्यांनी मुली व महिलांच्या स्व-संरक्षणासाठीचा ‘किक ऍण्ड शॉट’ हा उपक्रम शैक्षणिक संस्थांमध्ये राबविला होता. यावेळी भीमशी भरमन्नावर व बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सहसचिव सुनील रायबागी उपस्थित होते.
Previous Articleनर्सिंग विद्यार्थ्यांना विद्याश्री वेतन द्या
Next Article यल्लम्मा मंदिर दीपोत्सवाने उजळले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.