ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकेवर काढले आहे. यामध्ये बॉलिवूड आणि टीव्हीवरील अनेक कलाकारांना या कोरोना विषाणूच्या संसर्गाला बळी पडले आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर निर्माते संजय लीला भन्साळी त्यानंतर आता टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सुंदरच्या भूमिकेत असलेल्या मयूर वाकाणी आणि ‘भिडे सरांची’ भूमिका साकारणार्या मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मयुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरसध्या कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे मंदार यांना होम क्वारंटाइन केले आहे. सध्या मंदारची प्रकृती स्थिर आहे. मंदार म्हणाले की, ‘हो, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाही आहेत.
तर मयूर हा चित्रीकरण पूर्ण करून आपल्या घरी अहमदाबादला गेला होतो. तिथे त्याला कोरोनाची लक्षणे जाणवली असता त्याने स्वतः ची कोरोनाची टेस्ट करून घेतली. त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्याची पत्नी घरी क्वारंटाइन असून मयूरवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांची आता कोरोना टेस्ट केली जाणार आहे.