बेळगाव : दि ताराराणी महिला पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या समादेवी कार्यालयात नुकतीच पार पडली. प्रारंभी महाप्रतापी ताराराणी व संस्थापक कै. प्राचार्य एस. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन अध्यक्षा भाग्यरेखा घोरपडे व उपाध्यक्षा गीता बामणे यांनी केले. सोसायटीच्या संचालिका शुभांगी एस. भातकांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रोसिडिंग वाचन व अहवाल वाचन कार्यवाह सुनीता निंबाळकर यांनी केले. संस्थेच्या संचालिका मंजुषा पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालिका सभासद, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
Previous Articleशालेय सहलींना बेक, परिवहनला आर्थिक फटका
Next Article ज्येष्ठ नागरिक सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.