वृत्तसंस्था/ काबूल
तालिबानकडून सोमवारी अफगाण क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी संचालकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. अफगाण क्रिकेट मंडळाचे कार्यकारी संचालक हमीद शिनवारी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
तालिबानचे नवे नियुक्त अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचा लहान भाऊ अनास हक्कानी याने शिनवारी यांची हकालपट्टी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावेळी त्यांना बडतर्फ करताना कोणतेही कारण नमूद केले नाही. मात्र त्यांच्या जागी अफगाण क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी संचालकपदी नसीबउल्ला हक्कानी यांची नियुक्ती केल्याचे त्यांना सांगितले. ते सिराजुद्दीन हक्कानी यांचे नातेवाईक आहेत का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिराजुद्दीन हक्कानी यांनी गेल्या 20 वर्षात काबुलमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले होते. त्यामुळे एफबीआयसाठी ते वाँटेड असलेले आरोपी आहेत.