ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. देशाबाहेर पडण्यासाठी नागरिकांना सध्या काबुल विमानतळ हा एकच मार्ग असून, त्यावर अमेरिकन आणि नाटो सैन्याचे नियंत्रण आहे. त्यामुळे तालिबानने आता अमेरिकेला धमकीवजा इशारा दिला आहे.
31 ऑगस्ट ही अमेरिकन सैनिकांच्या वापसीची डेडलाईन तालिबानकडून जाहीर करण्यात आली आहे. तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य माघारी न गेल्यास त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, असे तालिबानचे प्रवक्ते साहेल शाहीन यांनी म्हटले आहे. 5 हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक काबुल विमानतळावर तैनात असून, ते अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत रेस्क्मयू मिशन पूर्ण करून आपल्या सैनिकांना माघारी बोलावू, असे म्हटले होते. मात्र, रेस्क्मयू मिशन पूर्ण न झाल्यास 31 ऑगस्टनंतरही सैन्य अफगाणिस्तानात राहू शकते, असे संकेत बायडेन यांनी दिल्याने तालिबानने अमेरिकेला हा धमकीवजा इशारा दिला आहे.