अफगाणिस्तानातून परतणाऱयांच्या सुरक्षेसह प्रकृतीचीही भारताला चिंता
अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या लोकांना भारत सरकार बाहेर काढत आहे. काबूल विमानतळावरील गर्दी पाहता तेथे कोरोना संक्रमण फैलावण्याचा मोठा धोका आहे. याचमुळे खबरदारीदाखल लँडिंगंनतर प्रत्येक रेस्क्यू फ्लाइटमधील प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करविली जात आहे. सरकारने आता अफगाणिस्तानातून परतणाऱयांना मोफत पोलिओ लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोहीम राबवून पोलिओची लस देण्यात आली.
पोलिओपासून वाचविण्यासाठी निर्णय
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. दिल्ली विमानतळावरील लसीकरण मोहिमेचे छायाचित्र शेअर करत त्यांनी अफगाणिस्तानातून परतणाऱयांना मोफत पोलिओ लस ओपीव्ही आणि एफआयपीव्ही देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
पोलिओ विषाणू तीन प्रकारचे असते. पीव्ही-1 हा निसर्गात सहजपणे आढळून येतो. पण तिन्ही प्रकार अत्यंत संक्रामक असतात. पीव्ही-2 आणि पीव्ही-3 विषाणूचे अस्तित्व संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण पीव्ही-1 चे रुग्ण अद्याप पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आढळून येतात. पोलिओ लसीचा ओरल डोस देण्यात येतो.