100 दहशतवाद्यांचा खात्मा : 90 जवानही ठार
काबूल : अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात जिल्हय़ांवरील नियंत्रणावरून संघर्ष पेटला आहे. 80 जिल्हय़ांमध्ये अफगाण सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये थेट संघर्ष सुरू आहे. मागील 24 तासांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. तर सुरक्षा दलांनी स्वतःचे 90 साथीदार गमावले आहेत.
दौलताबादच्या फरयाब जिल्हय़ावर कब्जाचा दोघेही दावा करत आहेत. संरक्षण मंत्रालयानुसार तालिबानच्या कब्जातील जिल्हय़ांना पुन्हा ताब्यात घेतले जात आहे. कुंदुज प्रांतातील खानाबाद जिल्हा पुन्हा नियंत्रणात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. फरयाब जिल्हय़ात तालिबानशी झालेल्या संघर्षात अफगाण सैन्याचे 23 कमांडो मारले गेले आहेत.
अनेक ठिकाणी पाकिस्तानातील पंजाब प्रांत आणि इराणमधून आलेले दहशतवादी तालिबानसोबत मिळून अफगाण सैन्याशी संघर्ष करत असल्याचे खासदार अब्दुल सत्तार हुसैनी यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि नाटो सैन्य परतल्यावर हा संघर्ष होत आहे.