ऑनलाईन टीम / काबुल :
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्ष पूर्ण झाली. या दिवसाची आठवण करून देत अमेरिकेला डिवचण्यासाठी तालिबान आज (11 सप्टेंबरलाच) अफगाणिस्तानात सरकार स्थापनेचा कार्यक्रम घेणार होते. मात्र, मित्रराष्ट्रांच्या दबावानंतर तालिबानने हा निर्णय रद्द केला.
16 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तान काबिज केला. त्यानंतर तालिबानने सरकार स्थापन केले. सरकारमधील मंत्रिमंडळाने कामही सुरू केले. मात्र, सरकार स्थापनेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. तालिबानने या कार्यक्रमासाठी पाकिस्तान, चीनसह सहा देशांना निमंत्रित केले आहे. दरम्यान, तालिबान अमेरिकेला 11/9/2001 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करुन देण्यासाठी आज बरोबर 20 वर्षांनी सरकार स्थापनेचा कार्यक्रम घेणार होते. मात्र, मित्र राष्ट्रांच्या दबावानंतर तालिबानने आपला निर्णय मागे घेतला आहे.
20 वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली तालिबानने अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत अफगाणिस्तानात पाऊल ठेवले. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार होते. हे सरकार अमेरिकेने उलथवून लावत अफगाणिस्तानात सत्तांतर घडवले होते.