बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खाते व जॉन वेस्ली मेथडीस्ट पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक राजशेखर पट्टणशेट्टी, रेव्ह. मार्टीन फास्टर, प्राचार्य अनिल मुडलगी, दिग्विजय सिदनाळ, जी. एन. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी एम. सी. धन्वंत, प्रभू शिवनायकर, क्रीडा निर्देशक विनय घोरपडे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकविण्यात आला. टीना वानखडे, ऐश्वर्या नेसरकर, शुभांगी काकतकर, श्रावणी भाटे यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. आकाश लमाणी याने सर्व खेळाडूंना शपथ देवविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुजित एस. के. यांनी केले. यावेळी पदवीपूर्व महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक उपस्थित होते. खोखो स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात ज्योती महाविद्यालयाने मराठा मंडळचा 3 गुणानी तर मुलींच्या विभागात ज्योती महाविद्यालयाने सरकारी सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालय संघाचा 6 गुणानी पराभव केला.