प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शनिवार दि. 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता मराठा मंदिर (रेल्वेओव्हरब्रिजजवळ) बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. तरी समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांनी केले आहे.