विविध गावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी : पूजाअर्चा-महाआरती : भगवे ध्वज-कार्यकर्त्यांच्या भगव्या फेटय़ांमुळे भगवेमय वातावरण
वार्ताहर / किणये
तालुक्मयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी मोठय़ा उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवपुतळय़ाची पूजाअर्चा, महाआरती, पोवाडे, व्याख्यान व विविध कार्यक्रम झाले. अनेक गावातील गल्ल्यांमध्ये, चौकांमध्ये भगवे ध्वज लावण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे अवघा तालुका भगवेमय बनला होता.
बेळगुंदी येथील संघर्ष ढोलताशा पथक व सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा व धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (तिथीप्रमाणे) शुक्रवारी साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
बेळगुंदी गावातील चौकात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणींनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता. यावेळी प्रसाद बोकडे, महेश पाटील, विजय चौगुले, शुभम नाकाडी, रामकृष्ण पाटील, प्रदीप गावडा, किरण गावडा, जोतिबा मुगुटकर, कविता सुतार, काजल गावडा, स्नेहल नाकाडी, दीपा पाटील, रिया मुगुटकर, भूमिका सुतार, आदींसह शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संघर्ष या संघटनेच्यावतीने ग्रामीण भागात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे कार्यकर्ते गडकिल्ल्यांची भ्रमंती व संवर्धन करण्यासाठी परिश्रम घेतात.
बस्तवाड-हलगा
बस्तवाड-हलगा येथील छत्रपती शिवराय शिवसृष्टी युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाची गेल्या दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. शिवपुतळा उभारून दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे विशेष सोहळय़ाचे आयोजन केले होते.
सकाळी आठच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यकम झाले. या कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता. सायंकाळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी उपस्थित शिवप्रेमी व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पिरनवाडी
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या शिवपुतळय़ाची शिवजयंतीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. पिरनवाडी गावात शिवजयंती सोहळा मोठय़ा थाटात साजरा केला. शिवपुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून जयराज हलगेकर, सचिन गोरले, बाळू शिंदे आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास सध्याच्या तरुणांनी समजून घेतला पाहिजे. तसेच त्यांचे आचारविचार सर्व कार्यकर्त्यांनी आचरणात आणले पाहिजे, असे सचिन गोरले यांनी बोलताना सांगितले. यावेळी प्रमोद मुचंडीकर, मारुती उसुलकर, किरण धामणेकर, सुनील राऊत, पिराजी शिंदे, विजयानंद नेसरकर, जोतिबा लोहार, जोतिबा गुंडोजी, नारायण मुचंडीकर, किरण नेसरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नागेनहट्टी अष्टविनायक युवक मंडळ
नागेनहट्टी येथील अष्टविनायक युवक मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवपुतळय़ाचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित अनेकांची भाषणे झाली. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.