वार्ताहर/ किणये
तालुक्मयात भक्तीमय वातावरणात दुसरा श्रावण सोमवार साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक येत होते. मास्क व सामाजिक अंतर राखून भक्तांनी दर्शन घेतले.
ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे पंचमंडळी व मंदिर व्यवस्थापन कमिटीतर्फे मंदिरांमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली व शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले.
तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये रामलिंगेश्वर, कलमेश्वर, सिद्धेश्वर, ब्रम्हलिंग अशी मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये श्रावण सोमवारनिमित्त सकाळी अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
श्रावणाच्या तिसऱया किंवा चौथ्या सोमवारी बहुतांशी गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक गावांमधील श्रावणातील महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे.
दरवषीच्या परंपरेमध्ये खंड पडू नये यासाठी पंचमंडळी व देवस्थान कमिटीतर्फे दर सोमवारी विधिवत पूजाअर्चा करण्यात येत आहे.
तीर्थकुंडये येथील डोंगरावर निसर्गरम्य अशा परिसरात श्री रामलिंगेश्वरचे देवस्थान आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी या मंदिरात पंचकमिटी व देवस्थान कमिटीतर्फे अभिषेक करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी विधिवत पूजाअर्चा केली. त्यानंतर शासनाच्या नियमांचे पालन करीत भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. रामलिंगेश्वर हे जागृत देवस्थान असून रामलिंगेश्वर पिंडीजवळ तीर्थकुंड आहे. या कुंडामधून बारा महिने पाणी येत असते.