वार्ताहर/ किणये
तालुक्मयातील शिवमंदिरांचा महिमा अगाध आहे. तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामेश्वर व ब्रह्मलिंग अशी मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये दरवषी श्रावण महिन्यात भक्तांची मोठी गर्दी असते. यंदा मात्र कोरोनामुळे श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारी भक्तांची गर्दी कमी दिसून आली. पहिला श्रावण सोमवार अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.
प्रशासनाच्या नियमानुसार मंदिरांमध्ये सामाजिक अंतर, मास्क वापरूनच भक्तांनी दर्शन घेतले. मंदिरात येणाऱया भक्तांना अगोदर सॅनिटायझर देण्यात येत होते. कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशीच मागणी भक्तांनी भोलेनाथाकडे केली. तालुक्मयाच्या डोंगर व निसर्गरम्य अशा परिसरात असलेली ही मंदिरे जागृत मंदिर म्हणून ओळखली जातात. कणबर्गी, मुचंडी, कडोली, बेनकनहळ्ळी, निलजी, बहाद्दरवाडी, मच्छे, अगसगा, राकसकोप, बेळगुंदी, पिरनवाडी, तुरमुरी, तारिहाळ आदी गावांमधील मंदिरांमध्ये पहिला श्रावण सोमवारनिमित्त पुजारी, देवस्थान पंचकमिटी अशा मोजक्मयाच लोकांच्या उपस्थितीत सकाळी शिवपिंडीची विधिवत पूजाअर्चा व अभिषेक करण्यात आला.
श्रावण महिन्यात काही मंदिरांमध्ये दर सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तर काही मंदिरांमध्ये श्रावणाच्या तिसऱया किंवा चौथ्या सोमवारी महाप्रसाद होतो. यंदा कोरोनामुळे बहुतांशी गावातील देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांनी महाप्रसाद रद्द केला आहे. परंपरेमध्ये खंड पडू नये म्हणून पहिल्या श्रावण सोमवारी अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवस्थान पंच कमिटीतर्फे येणाऱया भक्तांची विशेष खबरदारी घेतली. तसेच भक्तांना दर्शनासाठी गर्दी न करता सोडण्यात येत होते. एकीकडे कोरोनाची धास्ती तर दुसरीकडे आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाची आस भक्तांच्या चेहऱयावर दिसून आली