अबकारी-पोलीस अधिकारी सेवेत रुजू
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजून आता प्रचारालाही गती मिळाली आहे. आपणच निवडून येण्यासाठी प्रत्येकाकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षही आपल्या उमेदवारांसाठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत गोवा व इतर राज्यांतून होणारी बेकायदा दारू वाहतूक व आचारसंहितेचा भंग करणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी तालुक्मयातील तीन चेकपोस्ट आता 24 तास कार्यान्वित करण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर अबकारी, पोलीस अधिकारी व ग्राम पंचायतमधील काही कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
बेळगावसह राज्यातील ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बेळगावात गोवा व महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी बेकायदा दारू व इतर साहित्य आणणाऱयांवर करडी नजर ठेवण्यासाठी तीन चेकपोस्ट स्थापण्यात आले आहेत. बाची, बेकिनकेरे, राकसकोप या ठिकाणी हे नाके स्थापन करण्यात आले असून आता ते 24 तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना झाल्याने पोलीस अधिकारीही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अवैध कामे करणाऱयांवर आता आळा बसण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी आणि आचारसंहिता नोडल अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केल्या आहेत. विविध समस्यांवर तोडगा काढून आचारसंहिता भंग होणार नाही याचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. बेळगाव तालुक्मयातील बेकिनकेरे, बाची, राकसकोप या ठिकाणी हे चेकपोस्ट उभारण्यात आले, ते आता सक्रिय झाले आहेत.
महाराष्ट्र व गोव्याकडून येणाऱया वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. रात्रीचा दिवस करून अनुचित प्रकारांना आळा घाला आणि आचारसंहिता भंग करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी धडपडत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारीवर्ग आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बैठकीत तालुक्मयातील आचारसंहिता भंग होऊ नये यावर कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्यात तसेच अबकारी खाते व पोलीस प्रशासनाने आता या तीन चेकपोस्टवर 24 तास सेवा बजावण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव तालुक्मयात आता 57 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे तिन्ही चेकपोस्टवर ये-जा करणाऱया वाहनांची अधिकारी तपासणी करत आहेत..