माध्यमिक विभागातील सर्व मुख्याध्यापकांच्या बैठकीत गटशिक्षणाधिकाऱयांची सूचना
वार्ताहर /उचगाव
यावषी दहावीच्या वार्षिक परीक्षेपूर्वी पूर्वतयारी परीक्षा सोमवार दि. 21 पासून प्रारंभ होणार असून रोज सकाळी प्रश्नपत्रिका शिक्षण खात्याकडून दिल्या जाणार आहेत.तसेच परीक्षा कडकच घ्याव्यात, असा आदेश तालुका गटशिक्षणाधिकारी आर. पी. जुटन्नावर यांनी बेळगाव तालुक्मयातील माध्यमिक विभागातील सर्व मुख्याध्यापकांच्या बैठकीत मंगळवारी दिला.
हिंडलगा येथील हिंडलगा हायस्कूल येथे या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आर. पी. जुटन्नावर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत कुटे यांनी केले. तर येणारी वार्षिक परीक्षा, त्याचबरोबर पूर्वतयारी परीक्षा या संदर्भातील माहिती मेदार यांनी दिली. बैठकीत पुढील मुद्यांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. पूर्वतयारी परीक्षेसाठी रोज सकाळी प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमणे, परीक्षेवेळी कोरोना नियमांचे पालन सर्वांनी करणे, विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिका खुल्या करणे, पेपर संपता क्षणी त्या त्या विषयाच्या शिक्षकांनी पेपर तपासून त्यांचा निकाल जाहीर करणे, 28 तारखेला संपूर्ण परीक्षेचा निकाल तयार करून तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविणे, इयत्ता आठवी व नववीची परीक्षाही कडकच घेणे, वार्षिक परीक्षेमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱयाचा उपयोग करणे, शनिवारी पालक बैठक घेणे, सोमवार, मंगळवार व बुधवारी काही गावातील माध्यमिक शाळांमधून कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी अगसगे हायस्कूलमध्ये कन्नड व सांबरा स्कूलमध्ये मराठी, दि. 15 रोजी कडोली हायस्कूलमध्ये विज्ञान व बडाल अंकलगी सरकारी हायस्कूलमध्ये समाज विज्ञान, दि. 16 रोजी शिवाजी हायस्कूल येळ्ळूर येथे इंग्रजी तर शिंदोळी डीआयजी हायस्कूलमध्ये गणित विषयाची कार्यशाळा होणार आहे.