वार्ताहर / किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनामुळे व प्रशासनाच्या आदेशानुसार अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करून शिवप्रेमी भक्तांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवादन केले. व कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, अशीच मागणी शिवरायांकडे केली.
गुरुवारी तालुक्यात परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोना महामारी नसती तर अवघा तालुका गजबजून केला असता. मात्र सरकारच्या नियमावलींचे पालन करून शिवप्रेमींनी गर्दी न करता हा उत्सव साजरा करून शिवरायांच्या आदर्शाचे दर्शन घडवून दिले. अनेक गावांमधील भक्तांनी स्वतःच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा अर्चा करून जन्मोत्सव सोहळा साजरा केला. यामुळे यंदा अनेकांच्या घरा घरातूनही बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय…, जय भवानी जय शिवाजी… असा जयघोष ऐकू आला.
हलगा येथे शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजयंती साजरी
हलगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती व प्रेरणामंत्र म्हटले. दरवर्षी गावात मोठय़ा जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मात्र परंपरेमध्ये खंड पडू नये म्हणून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार साध्या पद्धतीने आम्ही हा सोहळा केला. असे आही मुख्य कार्यकर्त्यांनी सांगीतले. तसेच कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर पुढच्या वर्षी हा सोहळा जल्लोषात करू, असेही कार्यकर्ते म्हणाले.
बेळगुंदी ग्राम पंचायत कार्यालयातही शिवजयंती साजरी करण्यात आली. सध्या गावात कडक लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अध्यक्षा व पीडीओ यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
ग्राम पंचायत अध्यक्षा हेमा हदगल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी पीडीओ अश्विनी व सेपेटरी नाईक हे उपस्थित होते.
बहाद्दरवाडीत शिवजयंती
बहाद्दरवाडी गावातील निंगाप्पा देसुरकर व धोंडीबा देसुरकर यांनी आपल्या घरातच शिवजयंती साजरी केली. घरातील समोरच्या खोलीत आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई केली होती. कुटुंब प्रमुख सातेरी देसुरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात करण्यात आले. त्यानंतर मानसी देसुरकर व इतर मुलींनी पाळणा गीत म्हटले. यावेळी मधु गुंटेकर हे उपस्थित होते.
हुंचेनहट्टी येथील ग्राम पंचायत माजी सदस्य सुनील मोहिते यांनी आपल्या घरात शिवजयंती साजरी केली.
एपीएमसीत व्यापारी बांधवांतर्फे शिवजयंती साजरी
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी बांधवांच्यातर्फे हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती साधेपणाने मात्र अमाप उत्साहात साजरी करण्यात आली. विश्वासराव घोरपडे यांच्या दुकानामध्ये शिवमूर्तीचे पूजन संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. पं. माजी सदस्य विनायक होनगेकर यांनी प्रास्ताविक केली.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे परशराम मेंडके आणि लेखापाल कल्लाप्पा पाटील यांनी शिवरायांचा पाळणा गायीला. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ध्येयमंत्राने सांगता झाली. यावेळी व्यापारी गजानन घोरपडे, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, संभाजी होनगेकर, राजू जाधव, सहदेव पाटील, विनायक पाटील, वामन पाटील, यांच्यासह व्यापारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अलतगा येथे शिवजयंती उत्साहात
अलतगे येथील श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थान यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून महिला मंडळांनी शिव पाळणा म्हटला. ध्येय मंत्राने या सोहळय़ाची सांगता झाली.
यावेळी कल्लाप्पा जाधव, नितीन चौगुले, चंद्रकांत धुडूम, पुंडलिक पाटील, सुरज पाटील, आप्पाजी पाटील, गौतम धुडूम, किरण चौगुले, कृष्णा सुतार, वैजु लोहार, बाळू पाटील, किरण दळवी, लखन शहापूरकर, संभाजी घुग्रेटकर, किशोर कदम, अमर पाटील आदी शिवभक्त उपस्थित होते.
कंग्राळी खुर्द येथे शिवजयंती
येथे सलग दुसऱया वर्षी वाढत्या कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरी करण्यात आली. गावच्या प्रवेशद्वारातील अश्वारुढ शिवमूर्तीचे पूजन शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे गजानन पाटील उपस्थित होते. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी हुतात्मा मारुती बेन्नाळकर पथ या नामफलकाला पुष्पहार घातला. ऍड. एम. जी. पाटील यांनी श्रीफळ वाढविला.
प्रेरणामंत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शिवरायांची आरती आणि ध्येयमंत्राने सांगता झाली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे मनोहर पाटील, महादेव दिंडे, परशराम मेंडके, विनायक पाटील, सागर पाटील, व्ही. बी. पाटील, बी. डी. मोहनगेकर, बी. टी. पाटील, बाळ बसरीकट्टी, जोतिबा पाटील यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. चौकाचौकात शिवजयंती उत्सव शिवाय घराघरात शिवरायांचे जल्लोशी वातावरणात पूजन करत शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला.
खानापूर येथील शिवस्मारकात शिवजयंती खानापूर ः कोरोनाच्या महामारीमुळे व सरकारच्या नियमांचे पालन करत खानापूर येथील शिवस्मारक चौकात श्रीरामसेना हिंदुस्थानच्यावतीने साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्रीरामसेनेचे अध्यक्ष पुंडलिक मुतगेकर व रवी पाटील गस्टोळी याच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला अभिषेक, महापुजा व पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. श्रीरामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवजयंती साजरी केली. यावेळी मंजू गोंधळी, आदित्य कलाल, किरण कुंभार, भाऊराव कुंभार, किरण गोंधळी, रामचंद्र गोरल व श्रीरामसेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.