बेकिनकेरे, बाची आणि राकस्कोप येथे पोलीस तैनात
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह राज्यातील ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता अर्ज भरण्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बेळगावात गोवा व महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी बेकायदा दारू व इतर साहित्य आणणाऱयांवर करडी नजर ठेवण्यासाठी तीन चेकपोस्ट स्थापण्यात आले असून कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी आणि आचारसंहिता नोडल अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केले आहे.
तालुका पंचायत सभागृहात ही बैठक झाली. व्यासपीठावर तहसीलदार आर. के. कुलकर्णी होते. यावेंळी विविध समस्यांवर तोडगा काढुन आचारसंहिता भंग होणार नाही याचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. बेळगाव तालुक्मयातील बेकिनकेरे, बाची, राकसकोप या ठिकाणी हे चेकपोस्ट उभे करण्यात आले असून रात्रीचा दिवस करून अनुचित प्रकारांना आळा घाला आणि आचारसंहिता भंग करणाऱयांवर कारवाई करा, असे आवाहन त्यांनी अबकारी विभागातील अधिकाऱयांना केले.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी अधिकारीवर्ग आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. बेळगाव तालुक्मयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने तालुका पंचायतमध्ये बैठक बोलविण्यात आली होती. मात्र ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक गुरुवारी पार पडली असून याबाबत अधिकाऱयांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या बैठकीत तालुक्मयातील आचारसंहिता भंग होऊ नये यावर कोणकोणते उपाय योजना राबविण्यात याव्यात, तसेच अबकारी खाते व पोलीस प्रशासनाने या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविणार याची माहिती जाणून घेण्यात आली. बेळगाव तालुक्मयात आता 57 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या अर्ज भरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरुवात होणार आहे. तेंव्हा कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी आपण साऱयांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली..