कोरोनाला पळवून लावण्यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार सर्वत्र दीपोत्सव
वार्ताहर / .किणये
शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा । शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते ।।
कोरोनाचा अंधकार दूर व्हावा व सर्वांच्या आयुष्यात तेजोमय प्रकाश यावा यासाठी तालुक्मयात रविवारी रात्री दीपोत्सव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटे दीप, मेणबत्ती, बॅटरीचे टॉर्च पेटवून कोरोना विरुद्धच्या लढाईत भारतवासियांची एकजूट दाखवा असे आवाहन केले होते. या आवाहनाला तालुक्मयात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लखलखत्या दिव्यांनी शहरपरिसरासह तालुका तेजोमय बनला होता. रविवारी रात्री आठपासूनच दीप लावण्याची तयारी सुरू होती.
ठीक 9 वाजता गावागावामध्ये दीप लावण्यात आले. लहानापासून वयोवृद्धांनीही या दीपोत्सवात भाग घेतला होता. घरांच्या कट्टय़ावर, दारात, गच्चीवर दिवे लावण्यात आले होते. काहीजणांनी बॅटरीचे टॉर्च पेटविले होते. काही गावामध्ये भारताचा नकाशा काढून त्यामध्ये दीप लावण्यात आले होते.बहुतांशी ठिकाणी ‘गो कोरोना’ असे लिहून त्यावर दीप लावले होते. दीपप्रज्वलित करताना प्रत्येकाच्या मनातून कोरोनाच्या संकटातून आमची मुक्तता व्हावी असाच भाव दिसून येत होता.
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊन गांभीर्याने पाळले जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लढणारे डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्त्या, पोलीस, आरोग्य खात्याचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. दीपोत्सव करताना प्रत्येकामध्ये उत्साह दिसून आला.
उचगावात सकारात्मक प्रतिसाद
उचगावः‘एक दिवा स्वतःसाठी देशाच्या हितासाठी’ असे म्हणत तालुक्यात कोरोनाविरोधातील लढाईचा निर्धार अधिक बुलंद करण्यात आला. पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवे लावले. यामुळे घरे प्रकाशात उजळून निघाली.
नऊ वाजता प्रत्येकाने आपापल्या घरातील दिवे घालविले आणि बाल्कनी, टेरेसवर, अंगणात दिवे लावले. लोकांनी उत्स्फूर्तपणे पणती, मेणबत्ती, मोबाईलचे फ्लॅश, बॅटरीचे लाईट लावले. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवले. यावेळी गावागावातील गल्लोगल्ली ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मात्रम’ अशा घोषणांनी गावे दणाणून गेली. तर अनेक ठिकाणी फटाक्मयांची आतषबाजीही करण्यात आली. काही ठिकाणी युवकाने कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घरीच राहू अशी शपथ घेतली.