आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन : गावोगावी भक्तांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन : कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी घातले साकडे
वार्ताहर /किणये
पंढरीची वारी आहे माझ्या घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ।।
व्रत एकादशी करीन उपवासी ।
गाईन अहर्निशी मुखी नाम ।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कण्यांतीचे तुका म्हणे ।।
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे वारकऱयांनी मंगळवारी आपल्या सावळय़ा विठूरायाचा गजर केला. वारकऱयांसाठी पंढरीची वारी करणे हे व्रतच आहे. पायी दिंडीतून पंढरीला जाऊन लाडक्मया विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतरच त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. यंदाही कोरोना महामारीच्या संकटामुळे पंढरीची वारी प्रशासनाने रद्द केली. तरीही विठ्ठलावर असणारी अपार श्रद्धा भक्तांची कमी झालेली नाही. मंगळवारी तालुक्मयातील गावागावांमध्ये दिंडय़ा, भजन, प्रवचन, कीर्तन, असे कार्यक्रम झाले. यामुळे अवघा तालुका विठ्ठलमय झाला होता.
दरवषी आषाढी एकादशीला महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक वारीसाठी पंढरपूरला जातात. गेल्या वषीपासून कोरोनामुळे वारी रद्द झाली आहे. यामुळे वारकरी सांप्रदायाची तळमळ वाढली आहे. आषाढी एकादशीनिमित्त ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिराची हार फुलांनी सजावट तसेच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
‘उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा’ असे म्हणत मंदिरांमध्ये पहाटे पहाटे काकड आरतीचा गजर होताना दिसून आला. विठ्ठलाची विधिवत पूजा अर्चा, अभिषेक कार्यक्रम झाले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीला भाविक जमा झाले होते. प्रशासनाच्या नियमावलीनुसार मास्क, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतराचे भान ठेवून विठ्ठलाचे दर्शन भाविकांनी घेतले.
तालुक्मयातून दरवषी आषाढी एकादशीनिमित्त अनेक गावातून पायी दिंडय़ा पंढरीला जातात या दिंडय़ांना यंदाही ब्रेक लागला असल्याने परंपरेमध्ये खंड पडू नये म्हणून गावमर्यादित दिंडय़ा झाल्या. पांढरे वस्त्र, डोक्मयावर पंढरी टोपी, फेटा, कपाळावर केसरी गंध, हातात टाळ, घेऊन वारकरी दिंडीत तल्लीन झालेले पहावयास मिळाले.
‘बोलावा विठ्ठला, पहावा विठ्ठल, करवा विठ्ठल, जीवेभाव’ असे म्हणत दिवसभर विठ्ठलाच्या नामस्मरणात वारकरी व भक्तगण दंग होते. सकाळपासूनच भाविक मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेताना दिसत होते. तालुक्मयात गेल्या चार पाच वर्षापासून वारकऱयांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. आषाढी, कार्तिकी, माघ एकादशीनिमित्त वारकरी मोठय़ा संख्येने माझ्या जाrिवची आवडी पंढरपूरा नेईन गुढी असे म्हणत, पंढरपूरला जातात. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून विठ्ठल आणि त्याचे भक्त एकमेकांच्या भेटीसाठी आतुरलेले आहेत. पंढरपूरला जाता आले नाही तरी, प्रत्येक वारकऱयाच्या हृदयात आणि नजरेसमोर सावळय़ा विठ्ठलाचे रुप नेहमीच दिसते. हीच भावना ठेवून एकादशीनिमित्त विठ्ठलाचे नामस्मरण करतात.
सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगात मनुष्य प्राणी चिंताग्रस्त बनला आहे. मानसिक समाधानासाठी भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, असे विचार थोर संतांनी सांगितले आहेत.
बेळगुंदीत भक्तिभावाने एकादशी
बेळगुंदी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठय़ा भक्तिभावाने झाला. पहाटे काकडारती, पूजाअर्चा झाली. त्यानंतर दिवसभर वारकऱयांनी भजन, कीर्तन केले. अगदी सुमधूर आवाजात चालू असणारे भजन पाहून बेळगाव, राकसकोप रस्त्यावरून ये जा करणारी मंडळीही मंदिराच्या दिशेने येऊन या भजनात सामील होताना दिसून आले.
कलखांब ब्रह्मलिंग मंदिर
कलखांब येथील ब्रह्मलिंग मंदिरात पहाटे काकड आरती झाली. त्यानंतर महिला भजन झाले.
‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियल्या ।।
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा ।।
म्हणे व्यासाचीये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवाघरी ।।
असे म्हणत मृदंग आणि टाळाच्या तालावर हरिपाठाचा कार्यक्रम झाले.
खादरवाडी
खादरवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा केला. सोमवारी सायंकाळी गावातील ब्रह्मलिंग मंदिर येथून दिंडीचे प्रस्थान झाले. टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली. ही दिंडी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात विसाव्यासाठी आली. रात्री तुरमुरी येथील हभप दुर्गेश खांडेकर यांचे कीर्तन झाले. मंगळवारी पहाटे, काकड आरती झाली. त्यानंतर गावातील कोरोना योद्धय़ाचा विशेष सत्कार करण्यात आला. वडगाव येथील संत मुक्ताबाई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी या सोहळय़ाची सांगता होणार आहे.
किणये येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. अष्टे गावातही दिंडीचा सोहळा झाला.
गावोगावी घुमला टाळ-मृदंगाचा गजर
अतिवाड : येथील सांप्रदायिक पारायण मंडळाच्यावतीने मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. कोरोनामुळे सलग दोन वर्षे पंढरपूरला जाणाऱया दिंडय़ांना बेक लागला. मात्र दिंडीची परंपरा खंडित न करता गावात दिंडी काढून परंपरा जपण्यात आली.
मंगळवारी पहाटे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, वसंत पाटील, हभप शिवाजी बेळगावकर, हणमंत कणबरकर, वसंत पाटील, गुंडू पाटील, विठ्ठल कालकुंद्रीकर, बाळू सुतार, दशरथ हेब्बाळकर, लक्ष्मण हेब्बाळकर, मल्लाप्पा कडोलकर, इराप्पा मास्तोळे, बाळू पाटील शांताराम सुतार यासह वारकरी उपस्थित होते.
आंबेवाडी घळगेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
आंबेवाडी येथील सांप्रदायिक घळगेश्वर भजनी मंडळातर्फे घळगेश्वर मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी सकाळी काकडआरती, दुपारी भजन सायंकाळी हरिपाठ व नंतर भजन झाले. मंगळवारी सकाळी काकडआरती, त्यांनतर दिंडी काढण्यात आली. दुपारी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 4 वाजता हरिपाठ, रात्री 8 वाजता हभप निवृत्ती मुंचडीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी पहाटे काकडआरती झाल्यानंतर तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
बेकिनकेरे
बेकिनकेरे येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळातर्फे मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. सोमवारी रात्री जागर भजनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी पहाटे काकडआरती, हरिपाठ झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी शिवाजी बसरीकट्टी, कृष्णा मोरे, वीरभद्र तोरे, विश्वनाथ भोगणसह वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
हंदिगनूर
हंदिगनूर येथील सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. येथील विठ्ठल रूखुमाई मंदिरात काकडारती, हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी वारकरी मंडळ, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
निलजी
निलजी येथील श्रीराम वारकरी भजनी मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. श्रीराम मंदिरात पहाटे काकडारती, हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळी 11 ते 1 महिला भजन, दुपारी 4 ते 6 हरिपाठ व रात्री हभप आनंदराव पाटील-मळगे यांचा प्रवचन व किर्तनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी हभप गोविंद महाराज, गजानन महाराज, नागराज देसाई महाराज, बंडू महाराज, यल्लाप्पा महाराजासह वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
नंदिहळ्ळी-राजहंसगड परिसरात आषाढी एकादशी भक्तिभावाने
धामणे : नंदिहळ्ळी येथे सोमवार दि. 19 रोजी दुपारी 12 वाजता येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून दिंडी काढण्यात आली. दिंडीची सुरुवात हभप कल्लाप्पा जाधव यांच्या हस्ते झाली. सायंकाळी विठ्ठल-रखुमाई मंदिरात सांगता झाली. मंगळवार दि. 20 रोजी एकादशी रोजी पहाटे 4 ते 6 काकड आरती झाल्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत प्रवचन झाले. दुपारी 1 ते 3 महेंद्र पाटील महाराज चिक्कलवाड (ता. चिकोडी) यांचे कीर्तन झाले. सायंकाळी 5 पासून विठ्ठल मंदिरात भजनाचा कार्यक्रम होऊन दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
राजहंसगड
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून एकादशीनिमित्त गावात टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी मंदिर कमिटीतर्फे सुळगे (ये.) ग्रा. पं. अध्यक्षा गंगव्वा नाईक, उपाध्यक्ष दत्ता पवार, ता. पं. माजी सदस्य सिद्धाप्पा छत्रे, बाळू इंगळे, सिद्धाप्पा नाईक, लक्ष्मी गडकरी, ज्योती इंगळे, हणमंत नावगेकर, भाऊराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. विणापूजन व दिंडीचे पूजन मान्यवरांनी केले. दिंडीची सांगता होऊन वारकऱयांनी मंदिरातच दोन दिवस मुक्काम केला. याप्रसंगी भजनाचा कार्यक्रम पार पडला. बुधवार दि. 21 रोजी भजन व सायंकाळी ममद्याचा कार्यक्रम करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
धामणे
येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, भजन, हरिपाठ, प्रवचन व रात्री कीर्तन करत आषाढी एकादशी साजरी केली. बुधवारी काकडी आरती झाल्यानंतर गावभर दिंडी काढून दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
देसूर
येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दि. 20 रोजी विविध कार्यक्रम पार पडले. काकड आरती, भजन कार्यक्रम पार पडल्यानंतर हभप सुरेश महाराज झुंजवाडकर यांचे प्रवचन झाले. रात्री कीर्तन कार्यक्रम होऊन दुपारी भजन झाले. बुधवार दि. 21 रोजी पहाटे काकड आरतीनंतर मंदिरपासून दिंडी निघून दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
नागेनहट्टी
येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मंगळवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर सकाळी 11 वाजता मंदिरापासून दिंडी काढली. सायंकाळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आवारात सांगता झाली. रात्री 8 पासून रात्रभर भजन कार्यक्रम झाला. बुधवार दि. 21 रोजी द्वादशीला सकाळी काकड आरती झाल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी देवाचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
कंग्राळी बुद्रुक येथे आषाढी एकादशी भक्तिभावाने
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक येथील वारकऱयांनी आरोग्यविषयक नियमांचे पालन करत विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी केली. मंगळवारी सकाळपासूनच विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये विठ्ठल, रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी पहाटे काकडाआरती व इतर विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भक्तीगीतांचा गजर ऐकताना गावामध्ये जणू पंढरपूर अवतरल्यासारखे वाटत होते.
गौंडवाड विठ्ठल -रखुमाई मंदिर
गौंडवाड येथील वारकऱयांनी आपल्या गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आषाढी एकादशी साजरी करून विठूरायाचे दर्शन घेतले. मंदिरामध्ये विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. वारकरी मंडळींनी व गावातील भक्तांनी दर्शन घेऊन आषाढी एकादशी साजरी केली. रात्री मंदिरामध्ये भजन व किर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
कुद्रेमनी येथे मनोभावे आषाढी एकादशी
कुदेमनी येथे भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी केली. मंगळवारी दिवसभर गावातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिरात भजनी मंडळांनी भजन, अभंग, किर्तनाचे सादरीकरण तसेच मंदिरात देवदर्शन घेऊन यंदाची आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर
श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीवर हभप शांताराम गुरव, जोतिबा शि. पाटील यांच्या हस्ते अभिषेक घातला. लक्ष्मी जांबोटकर, अश्विनी जांबोटकर यांनी पंचारती ओवाळल्या. श्री परशराम पाटील, अर्जुन राजगोळकर, विलास गुरव, बबन गुरव, तुकाराम धामणेकर, राजू धामणेकर, सुहास गुरव यांनी मूर्तिपूजन केले. मल्लाप्पा निं. पाटील यांनी किर्तनाची सेवा केली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता
झाली.
हनुमान मंदिरात पूजा -अर्चा
हनुमान मंदिरात मंगळवारी दिवसभर भजन, अभंग झाले. हभप अरुण देवण, शंकर पाटील यांच्या हस्ते हनुमान मूर्ती पूजन झाले. हभप व्हनाप्पा पन्हाळकर यांनी कीर्तन केले. दिवसभर भाविकांनी देवदर्शन घेवून एकादशी साजरी केली. गावातील श्री गणेश मंदिरात मूर्तीपूजन, भजन कार्यक्रम होवून आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कणबर्गीत आषाढी एकादशी साधेपणाने
कणबर्गी : कणबर्गी येथे मंगळवारी आषाढी एकादशी साधेपणाने साजरी केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया पंढरपूर येथील विठोबाचे दर्शन गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद आहे. त्यामुळे वारकऱयांनी मनातील खंत व्यक्त करत कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करण्याचे साकडे विठ्ठलचरणी घातले.
पारंपरिक पद्धतीने पहाटे काकड आरती, त्यानंतर पुरोहितांकरवी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर अभिषेक करून विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. दहा ते दुपारी एक या वेळेत गाथा भजन झाले. हरिनाम व टाळ मृदंगाच्या गजरात प्रतिकात्मक दिंडी काढण्यात
आली.
मंदिरात फळा-फुलांची आरास व विद्युत रोषणाई करून सजावट केली होती. हभप चंद्रकांत सावी महाराज यांचे कीर्तन झाले. कोरोनाचे सर्व नियम पाळत दिवसभर भाविकांनी सावळय़ा विठ्ठलाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
टाळ मृदंगाच्या गजरात कडोलीत एकादशी साजरी
कडोली : टाळ मृदंगाच्या आणि हरिनामाच्या गजरात कडोली येथे आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. श्री कलमेश्वर भजनी मंडळ आणि श्री कलमेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळांतर्फे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा-अर्चा पार पडली. त्यानंतर दिवसभर भजनी मंडळाच्यावतीने भजनाचे कार्यक्रम पार पडले. तसेच गावातील भक्त मंडळींनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त केदनूर, जाफरवाडी, बंबरगा, हंदिगनूर येथेही बजनी मंडळांनी आणि ग्रामस्थांनी भजनाचे आयोजन केले होते.